गोव्यात आजपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाला सुरवात

पणजी, २० नोव्हेंबर २०२२ : भारताच्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा आज उघडणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, या खात्याचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगण यांच्यासह अजय देवगण, सारा अली खान, जॉकी श्राफ, वरुण धवन, प्रभूदेवा, अमृता खानविलकर आदी कलावंतांची मांदियाळी उद्धाटन समारंभास उपस्थित राहणार आहे.

पणजीपासून जवळच असलेल्या बांबोली येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रंगारंग कलाविष्कारासह इफ्फीस प्रारंभ होईल. यंदा संगीत वाद्यांच्या आकारात मोरांच्या कलाकृती उभारल्या आहेत. देश-विदेशांतील कलावंतांसह इफ्फीच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी पणजी सजलेली आहे.

महोत्सवात ५२ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी आशा पारेख यांच्या भूमिकांनी गाजलेल्या चित्रपटांतील कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकण्यात येणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यंदा प्रथमच या महोत्सवाचे आयोजन करीत आहे. प्रारंभीच्या चित्रपटाचा खेळ आगोदर होईल, त्यानंतर रंगारंग कलाविष्कार असतील, असे सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा