चंदीगड, १६ डिसेंबर २०२२: पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या एका हेराला चंदीगड येथून अटक करण्यात आलीय. आयबीच्या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी त्रिपेंद्र सिंग (४०) याला बुधवारी रात्री उशिरा चंदीगडच्या सेक्टर-४० येथून अटक केली. आरोपी शिख फॉर जस्टिस आणि पाकिस्तान आयएसआयसाठी भारताची हेरगिरी करत असल्याचे सांगण्यात येतंय. त्याचा रॅडिकल गटाशीही संबंध होता. आरोपीनं आयएसआयला पाठवलेले विविध पोलीस इमारतींचे फोटो आणि लोकेशन्स, मोबाईल फोनमध्ये केलेल्या एसएसओसी मोहाली इमारतीच्या रेकीचे व्हिडिओ जप्त करण्यात आलेत.
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आरोपी गेल्या ४ वर्षांपासून आयएसआयला पंजाबमधील महत्त्वाच्या सरकारी इमारतींचे नकाशे आणि फोटो पाठवत होता. अलीकडंच पंजाब पोलिसांच्या कार्यालयावर रॉकेट लाँचर हल्ल्याचाही आरोपीशी संबंध येत आहे. या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत.
असं सांगितलं जात आहे की, अधिकाऱ्यांना १४ डिसेंबर रोजी सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, घर क्रमांक ३३९७/१, सेक्टर ४०-डी, चंदीगड येथे राहणारा परमिंदर सिंग हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करत होता. भारताबाहेर बसलेले कट्टरवादी. गुप्तहेर म्हणून काम करत आहेत. तो भारतातील पोलीस स्टेशन आणि लष्कराच्या तळांची संवेदनशील कागदपत्रं, ठिकाणं आणि इतर माहिती पाकिस्तानला देत आहे, जे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे.
माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपीच्या ठिकाणी छापा टाकून त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून २ मोबाईल जप्त करण्यात आलेत. प्राथमिक तपासात असं समोर आलंय की, तापिंदर सिंगचा जन्म चंदीगडमध्ये झाला होता. तो डबल M.A. पदवीधर आहे, एम.ए. (पंजाबी) खालसा कॉलेज सेक्टर-२६, चंदीगडमधून आणि पंजाब विद्यापीठातून एम.ए. (राज्यशास्त्र) उत्तीर्ण आहे.
तापिंदर सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून परदेशात बसलेल्या कट्टरवाद्यांच्या संपर्कात आला. ज्याने त्याला कट्टरपंथी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडलं आणि अशा प्रकारे त्याने PAK-ISI गुप्तचर एजंटांशी हातमिळवणी केली.
तपिंदर ०३ वर्षांहून अधिक काळ ISI एजंट्ससोबत काम करत होता आणि आतापर्यंत त्याने त्यांना पंजाबमधील विविध पोलिस इमारती आणि लष्कराच्या तळांची संवेदनशील कागदपत्रं, ठिकाणं, फोटो आणि इतर माहिती पाठवलीय. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमधून तपिंदरचे पाकिस्तानी आयएसआय एजंट्ससोबतचे व्हॉट्सअॅप चॅट्स, विविध पोलिस इमारतींचे फोटो आणि लोकेशन्स आदी माहिती जप्त करण्यात आलीय. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने आतापर्यंत जी काही संवेदनशील माहिती आयएसआय एजंटना पाठवली होती, ती त्याने आपल्या फोनमधून डिलीट केलीय. पुढील तपासासाठी पोलिसांनी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे