पंबन पुलावरील रेल्वे वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद

तमिळनाडू, २९ डिसेंबर २०२२ : दक्षिण रेल्वेच्या मदुराई विभागाने जाहीर केले आहे, की पंबन ब्रीजवर ३१ डिसेंबरपर्यंत ट्रेनचे संचालन स्थगित करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे अभियंते चाचण्या घेतील, त्यानंतरच रेल्वेगाड्यांना पूल ओलांडण्याची परवानगी दिली जाईल, असे रेल्वे प्राधिकरणाने जाहीर केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २३ डिसेंबरपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले.

पंबन रेल्वे पूल रामेश्वरम बेट क्षेत्राला मंडपमच्या मुख्य भूभागाशी जोडतो. दक्षिण रेल्वे मदुराई विभागाने पंबन ब्रीजवर रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर बंदी घातली असून रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मदुराई आणि त्रिची येथील पॅसेंजर गाड्या रामनाथपुरम येथे थांबविण्यात आल्या होत्या आणि चेन्नईहून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या मंडपम येथे थांबविण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरम येथून गाड्या सोडण्यास परवानगी नाही. या स्थितीत रामेश्वरमहून सुटणाऱ्या गाड्या मंडपम येथून चालविल्या जात आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा