जळगावच्या हलव्याच्या दागिन्यांची महती सातासमुद्रापार!

पुणे, ११ जानेवारी २०२३ : विदेशात राहूनही भारतीय संस्कृती व परंपरांचे संवर्धनाचे कार्य अविरत सुरू ठेवणारे अनेक कुटुंबीय आहेत. त्यांपैकीच एक असलेल्या विशेष म्हणजे, खानदेशातील जळगाव येथील डोहोळे परिवारात गेल्या ७० वर्षांपासून (कै.) उमा उपेंद्र डोहोळे यांच्यापासून त्यांची नातसून अनघा अजय डोहोळे या तिसऱ्या पिढीपर्यंत हाताने हलव्याचे दागिने तयार करण्याची परंपरा कायम आहे.

उमा डोहोळे या स्वतः हाताने ५० किलोंपर्यंतचा हलवा बनवून महिला सहकारी मंडळास विकत देत असत आणि त्यांची मुलगी (कै.) शालिनी पानट व नात मीनाक्षी कुलकर्णी या दोघी हलव्याचे दागिने तयार करीत असतं. डोहोळे परिवाराची तिसरी पिढी ही परंपरा पुढे चालवीत असल्याची त्यांना माहिती खानदेशवासीयांनाच नव्हे, तर
सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार पोचली.

दागिने पोचले आयर्लंडला
मुलुंड येथील सुनीता सतीश बिडवई यांचे आजोळ जळगावचे असल्यामुळे त्यांना याविषयी माहिती होतीच. श्रीमती सुनीता बिडवई यांनी अनघा डोहोळे यांच्याशी संपर्क साधून विदेशात (आयर्लंडमध्ये) वास्तव्यास असलेली नवविवाहित मुलगी आदिती अंकुर त्रिपाठी हिच्या संक्रांती सणासाठी अनघा डोहोळे यांनी तयार केलेले हलव्याचे दागिने मंगळसूत्र, राणीहार, तनमणी, बांगड्या, तोडे, ठुशी, कंबरपट्टा, बाजूबंध, नथ, झुबे, बिंदी आणि जावईबापूंसाठी हलव्याचे दागिने मागणीप्रमाणे तयार करून घेतले व ते कुरियरद्बारे आयर्लंडला पाठविले.
घेऊन तिकडे पाठविले आहेत.

”कलेची आवड असल्याने सासरी हलव्याचे दागिने तयार करण्याचे मी स्वतः शिकून घेतले. आज मी तयार केलेले हलव्याचे दागिने विदेशात गेल्यामुळे माझ्या आजेसासूंपासूनचा परिश्रमाचा वारसा समृद्ध झाला आहे.” – अनघा डोहोळे

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा