लघुशंका प्रकरण : एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड, डीजीसीएकडून कारवाई

नवी दिल्ली, २० जानेवारी २०२३ : विमानातील लाजिरवाण्या वर्तनप्रकरणी डीजीसीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नुकतेच एअर इंडिया (AI) प्रवाशाने लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

मागील वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क दिल्ली विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. त्यानंतर ६ डिसेंबरलाही असाच प्रकार घडला होता. यानंतर नागरी उड्डाण महासंचलनालयाने या प्रकरणी ताशेरे ओढले असून, सदरचा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे आणि असे प्रकार विमानात घडत असतील तर ते एअर इंडियाचे अपयश आहे. असे डीसीजीएनने म्हटले आहे.

उड्डाण शिस्त आणि सदस्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार वैमानिकांच्या जबाबदाऱ्या अधोरेखित करताना डीजीसीएने सांगितले की, पायलट इन कमांड प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी आणि मालवाहतूक करण्यासाठी आणि उड्डाण शिस्त राखण्यासाठी वैमानिक जबाबदार असतो. विमान नियम, १९३७ च्या नियम १४१ च्या उपनियम (२) मध्ये असे नमूद केले आहे की पायलट कमांडमध्ये प्रवासी आणि मालवाहतूक यांच्या सुरक्षेसाठी आणि उड्डाण शिस्त आणि सदस्यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा