नाकाद्वारे देण्यात येणारी कोविड लस ‘या दिवशी’ होणार लाँच

नवी दिल्ली, २२ जानेवारी २०२३ :भारत बायोटेकने विकसित केलेली नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली कोविड-१९ लस २६ जानेवारीपासून लोकांना देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी शनिवारी दिली.

भोपाळमधील इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये (आयआयएसएफ) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, गुरांचे त्वचेच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी पुढील महिन्यात स्वदेशी बनावटीची लस लंपी प्रोव्हेक्टिंड लाँच केली जाईल. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमएनआयटी) येथे आयोजित आयआयएसएफच्या ‘फेस टू फेस विथ न्यू फ्रंटियर इन सायन्स’ या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता.

पुढे ते म्हणाले, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आमची अनुनासिक लस अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. त्यानंतर सरकारी रुग्णालयात प्रति डोस ३२५ रुपयांना मिळणार असून, खासगी लसीकरण केंद्रांसाठी प्रति डोस ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. अठरा वर्षांवरील नागरिकांसाठी कंपनी बूस्टर डोस डोस देखील देणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा