सुदान: आफ्रिकन देश सुदानमध्ये एका सिरीमिक फॅक्टरीच्या कारखान्यात एलिपजी टँकरमध्ये जोरदार स्फोट झाला आणि २३ जण ठार झाले. या मृतांमध्ये १८ भारतीय होते, तर स्फोटात १३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतदेह जाळल्यामुळे त्यांची ओळख पटली नसल्याचे भारतीय दूतावासाच्या वतीने सांगण्यात आले.
सुदानमधील भारतीय दूतावासाने मंगळवारी झालेल्या अपघातात भारतीयांच्या मृत्यूची माहिती दिली. तथापि, त्यांनी मृतांची संख्या जाहीर केली नाही. दूतावासाच्या संकेतस्थळावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या क्षणी प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतीय मजुरांसह अनेकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले.” कारखान्यात ५० हून अधिक भारतीय मजूर काम करतात, अशीही माहिती मिळाली. दरम्यान, तेथील सरकारने सांगितले की या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सुरुवातीच्या अहवालानुसार, त्या जागेवर सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे नव्हती.
सरकारच्या निवेदनात म्हटले आहे, “आग पेटवण्यासाठी अयोग्यरित्या ज्वलनशील सामग्री संग्रहित केली गेली.” सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.