राबडी देवींच्या निवासस्थानी ‘सीबीआय’ची धडक; नोकर भरती प्रकरणी होणार चौकशी

पाटणा, ६ मार्च २०२३ : माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानी सोमवारी (ता.६) सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाने (सीबीआय) धडक दिली आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी सीबीआय पथकाने चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती संशयित आरोपी आहेत. सीबीआय पथक जेव्हा निवासस्थानी पोचले तेव्हा राबडी देवी विधानपरिषदेत जाण्याच्या तयारीत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह मंत्री, लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव आणि राबडी देवींचे बंधू आणि विधानपरिषद आमदार सुनील कुमार सिंह उपस्थित आहेत.

लालूप्रसाद यादव सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण करून गेल्या महिन्यातच भारतात परतले आहेत. दरम्यान, सीबीआय पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी आल्याची माहिती मिळताच निवासस्थानाबाहेर आरजेडी समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. आरजेडी समर्थक केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा