पुणे, १६ मार्च २०२३: इतर समाजासाठी यशवंत घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना व विविध घरकुल योजना आहेत. पण, मराठा समाजातील गोरगरीब कुटुंबासाठी घरकुलाचा लाभ मिळत नाही. तरी मराठा समाजासाठी वेगळी घरकुल योजना सुरू करा यासंदर्भात शिवभिम प्रतिष्ठाण सामाजिक संस्था संस्थापक सचिव अमित भाऊ वांजळे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यंत विधानसभेत चर्चेसाठी पाठवा आणि लवकरात लवकर मराठा समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना सुरू करा अशी मागणी केली.
यावेळी अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, नागेश रिकिबे, अमोल शेडगे, लक्ष्मण जाधव जयवंत भोळे, संतोष सुतार, रामभाऊ वांजळे समीर झुंझुरर्के, अतिश झेंडे, सुमित रानवडे, मनोज करवंडे, पंकज मोरे, निखिल लांडे, अश्विनभाऊ ढगे, विनोद कोळी, लक्ष्मण कुठले, लखन राजपूत, किशोर पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी