नवी दिल्ली, १९ मे २०२३: आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा तसेच जेष्ठ वकील के.व्ही. विश्वनाथन यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असलेल्या न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांना निरोप देण्यात आला.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती मिश्रा तसेच विश्वनाथन यांना शपथ दिली. या दोन नियुक्त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची सर्व पदे भरली गेली आहे. दरम्यान पुढील १६ जून रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या न्यायमूर्ती जोसेफ यांना आज निरोप देण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्यांना सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस न्यायालयाचे कामकाज होणार नाही. या पार्श्वभूमीवर जोसेफ यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. जोसेफ आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत. १९७२ साली जेव्हा दिल्लीत आलो, तेव्हा तेच माझे पहिले मित्र होते. असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर