स्वतःची इंटरनेट सेवा सुरु करणारे केरळ होणार देशातील एकमेव राज्य

केरळ, ७ जून २०२३: केरळ सरकारने केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क (K-FON) नावाची नवीन सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर केरळ हे स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले देशातील पहिले आणि एकमेव राज्य बनले आहे. यासह केरळचे सरकार राज्यातील नागरिकांना मोफत इंटरनेट सेवा देणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १४ हजार कुटुंबांना मोफत इंटरनेटचा लाभ दिला जाणार आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ट्विटरवर लिहिले की, अखेर राज्यातील प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट देण्याचे स्वप्न साकार झाले आहे. आता २० लाख कुटुंबांना मोफत इंटरनेट देण्यात येणार आहे. K-FON च्या वेबसाइटनुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना मोफत इंटरनेट सेवा दिली जाणार आहे.

केरळमध्ये, हे नेटवर्क ३०,००० किलोमीटरवर पसरलेले आहे. यासाठी मल्टी-सिस्टम ऑपरेटर, इंटरनेट सेवा पुरवठादार आणि टीएसपी यांच्याशी भागीदारी केली जाईल. या प्रकल्पाद्वारे, केरळमधील १७,२८० हून अधिक सरकारी कार्यालयांना आधीच मोफत इंटरनेट सेवा कनेक्शन मिळाले आहे. त्याच वेळी राज्य सचिवालय आणि १० जिल्हाधिकारी आधीच त्याचा वापर करत आहेत. या योजनेअंतर्गत, प्रत्येक बीपीएल कुटुंबाला १५ mpbs वेगाने १.५ GB डेटा प्रतिदिन दिला जातोय.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा