राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच, सरकारकडून आणखी १० आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, ८ जून २०२३ : काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आता नव्याने आणखी दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश कुमार, राजगोपाल देवरा, डॉ. जगदीश पाटील, विजय सिंघल, डॉ. हर्षदीप कांबळे यांसारख्या वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राजेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे आयएस अधिकारी आहेत.त्यांची ग्रामीण विकास विभागात पुनर्वसन आणि पुनर्वसनासाठी अतिरिक्त मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १९९० च्या बॅचचे आयएस अधिकारी अनुप कुमार यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात कृषीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे प्रधान सचिव असलेल्या १९९२ च्या बॅचचे आयएस अधिकारी राजगोपाल देवरा यांच्याकडे राजशिष्टाचार विभागाचं प्रधान सचिवपद सोपवण्यात आले आहे. तर, उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.

डॉ. हर्षदीप कांबळे हे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदी कार्यरत होते त्यांना आता उद्योग संचालनालयाच्या विकास आयुक्तपदी पाठवण्यात आले आहे. तर, कृषी सचिव असलेल्या ए. एल. जऱ्हाड यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे. इतर उल्लेखनीय पदांवर असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव (शहरी विकास), राधिका रस्तोगी प्रधान सचिव (पर्यटन) आणि संजय खंदारे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सहकार आणि नोंदणी, को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचे आयुक्त असलेले जगदीश पाटील यांच्याकडे कोकण विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून विकास देशमुख यांच्याकडे कृषी सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या संजय देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे झाल्या आहेत.राजगोपाल देवरा, आयएस (१९९२), राजशिष्टाचार विभागाचं प्रधान सचिवपद (महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव),राजेश कुमार, आयएस (१९८८), अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग – मदत आणि पुनर्वसन विभाग,अनुप कुमार, आयएस (१९९०), अपर मुख्य सचिव, सहकार आणि पणन विभाग-कृषी विभाग,राधिका रस्तोगी, आयएस (१९९५),प्रधान सचिव, पर्यटन विभाग,संजय खंदारे,आयएस (१९९६),प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,एकनाथ डवले,आयएस (१९९७), प्रधान सचिव कृषी विभाग – ग्रामविकास विभाग,सौरभ व्यास, आयएस (१९९८), प्रधान सचिव, पर्यटन विभाग विकास आयुक्त, नियोजन विभाग, आर.एस.जगताप, आयएस (२००८), उप महा, यशादा पुणे,जितेंद्र दुडी,आयएस (२०१६),मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली – जिल्हाधिकारी सातारा

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा