अमेरिकन रेस्तरॉमध्ये ‘मोदीजी थाळी’ लाँच, दम आलूपासून काश्मिरी मेजवानी मिळणार

ट्रेंटन, अमेरिका १४ जून २०२३: न्यू जर्सी येथील एका रेस्तरॉने मोदीजींच्या नावाने एक खास थाळी सुरू केली आहे. त्यात अनेक भारतीय पदार्थांचा समावेश आहे. खिचडी, रसगुल्ला, सरसों का साग आणि दम आलूपासून ते काश्मिरी मेजवानी, तिरंगा इडली, ढोकळा, ताक आणि पापड असे अस्सल भारतीय पदार्थ या मोदीजी थाळीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून रोजी अमेरिकेला जाणार आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन हे स्टेट डिनरचे आयोजन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी,अनिवासी भारतीयांच्या सूचनेनुसार ही थाळी तयार करण्यात आल्याचे शेफ कुलकर्णी यांनी सांगितले. रेस्तरॉचे शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनीच ही ‘मोदीजी थाळी’ डिझाईन केली आहे.मोदीजी थाळीचा दर सध्या उघड झालेला नाही. न्यू जर्सी रेस्तरॉने सांगितले की ते लवकरच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याही नावाने एक खास थाली लाँच करणार आहेत, आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की ही थाळी देखील खूप लोकप्रिय होईल.

या मोदीजी थाळीचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, हि थाळी आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाच्या निमित्ताने सादर करण्यात आली आहे. २०१९ मध्ये, भारत सरकारच्या पुढाकाराने UN ने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य बाजरीचे वर्ष म्हणून घोषित केले होते. बाजरीबाबत जनजागृती करणे हा त्याचा उद्देश आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा