समृद्धी महामार्गावर बसवणार सीसीटीव्ही, वेगवान वाहनांना यंत्रणा करणार अलर्ट

मुंबई, १ जुलै २०२३: समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाहीत यासाठी स्मार्ट सिस्टीम कार्यान्वीत करण्यात येणार आहे. महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, यामुळे जास्त वेगाने निघालेले वाहन थांबविण्यात येईल किंवा अशा वाहनांना अलर्ट दिला जाईल. याबाबतचे काम जलद गतीने सुरू असून रस्त्यांचे जाळे बघता त्याला कदाचित थोडा वेळ लागू शकतो, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील बस अपघातानंतर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा अतिशय भीषण आणि दुर्देवी अपघात झाला. डीझेलची टाकी फुटल्याने आग लागली, यामध्ये २५ लोक मृत्युमुखी पडले तर ८ लोक वाचले. जखमींवर डॉक्टरांनी उपचार केले असुन जखमींमध्ये एकही गंभीर नाही. अपघातात मृतदेह जळून खाक झाले आहेत. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार आहे. तशा सूचना देण्यात आल्या.

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्याचा निर्णय झाला असुन जखमींच्या उपचारांचा खर्च शासन करणार आहे. ही घटना गंभीर असून पोलिस चौकशी करत आहेत. बसचा ड्रायव्हर वाचला असून त्याची चौकशी सुरू आहे. समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाहीत यासाठी स्मार्ट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. या रोडवर वाहनांचे स्पीड जास्त असते, लोक गाडी वेगाने चालवतात. त्यासाठी ड्रायवर लोकांचे प्रबोधन करावे लागणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा