नवी दिल्ली, ११ जुलै २०२३ : राजधानी दिल्लीत मागिल दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. काही सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे दिल्लीत काही ठिकाणचा रस्ता महापूरात वाहून गेला आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत परिस्थिती साधारण होत नाही, तोपर्यंत लोकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. इंडिया गेटजवळ रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याठिकाणी बॅरिकेट लावल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
मागिल दोन दिवसात दिल्लीत मुसळधार पाऊस झाला. अनेक भागात पाणी साचले आहे, काही गाड्या पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. तर काही गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी इंडिया गेटजवळ रस्ता खचला असल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. शेरशाह रोड वळणाजवळ रस्ता खचल्याने सी-हेक्सागन इंडिया गेटवर वाहतुकीवर परिणाम झाला असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना काळजी घ्यावी. दिल्लीत शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टी झाली आहे. दोन दिवसातल्या पावसाने ४१ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. रविवारी सकाळपासून सोमवार सकाळ पर्यंत १०७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
सध्याच्या परिस्थितीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत सगळ्या पक्ष्यांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, ही टीका करण्याची वेळ नाही. मागच्या कित्येक तासांपासून काम करीत असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर दिल्लीची यंत्रणा इतक्या मोठ्या पावसाचा सामना करण्यासाठी तयार नाही. परंतु आम्ही परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही केजरीवाल म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर