कोल्हापूर, २२ जुलै २०२३ : कोल्हापूर शहर आणि परिसरात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. दरम्यान राजाराम बंधारा येथे पहाटे दोन वाजता पंचगंगा नदीची पातळी ३५ फुट ८ इंच अशी होती.
सकाळी दहा वाजेपर्यंत यामध्ये तीन इंचांनी वाढ होऊन पाणी पातळी ३५ फुट ११ इंच अशी झाली. यानंतर सकाळी ११ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ३६ फुट इतकी झाली आहे. जसाजसा पावसाचा जोर वाढेल तसे धरणातील पाणी साठ्यातही वाढ होत राहणार आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनही सतर्क झाले असून, पुरस्थिती उद्धवल्यास त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षा बोटी तसेच बचाव पथके सुसज्ज ठेवण्यात आले आहे. असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर