नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेअंतर्गत १० हजार अमेरिकन ‘सिग सउर अॅसॉल्ट रायफल्स‘ ची पहिली खेप भारताला मिळाली आहे.
या अत्याधुनिक रायफलचा वापर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया नष्ट करण्यासाठी होणार आहे. भारतीय लष्कराला अधिक सक्षम व अद्यावत करण्यासाठी तब्बल ७२ हजार ४०० रायफलचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते.
या रायफल जम्मू-काश्मीरमध्ये तैनात भारतीय सेनेच्या उत्तर कमांडकडे सोपवल्या आहेत.
भारतीय लष्कराची ही उत्तर कमांड जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियान राबवते, तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या सर्व कारवायांना प्रत्युत्तर देते.
सरकारकडून करार
लष्कराला या ७२ हजार ४०० अद्यावत रायफलने सुसज्ज करण्यासाठी सरकारतर्फे ७०० कोटींपेक्षा अधिकच्या करारावर स्वाक्षरी केली होती. अमेरिकेतील शस्त्र निर्मिती करणारी सिग सउर ही कंपनी या रायफल देत आहे.