लोकनेते गोपीनाथ मुंडे मृत्यू आणि अनुत्तरित प्रश्न

महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. तळागाळातील लोकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाण्याचे काम गोपीनाथ मुंडे करत राहिले. परंतु यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला होता.

२०१४ साली भाजपप्रणित एनडीएची एकहाती सत्ता आली आणि गोपीनाथ मुंडे यांना ग्रामविकास खातंच मिळाले. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र या घटनेवर आजही कित्येक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
३ जून २०१४ ला सकाळी मुंडे आपल्या २१ लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते. पृथ्वीराज रोड-तुघलक रोडचे इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावरील सिग्नलवर इंडिका गाडी व मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू बाबत काही अनुत्तरित प्रश्न :

◆ अपघात घडला त्यावेळी फक्त ड्रायव्हर वीरेंद्र कुमार व सेक्रेटरी सुरेंद्र नायर तिथे होते का?

◆ कॅबिनेट मंत्री असूनही त्यांच्याबरोबर एकही सुरक्षा रक्षक का नव्हता?

◆ त्या दिवशी त्याचा पीएसओ कोठे होता, जो कोणत्याही किंमतीत त्यांच्या बरोबरच पाहिजे होता. कारबरोबर पायलट कार का नव्हती. कॅबिनेट मंत्री एकट्या गाडीत प्रवास का करत होते?

◆मागच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तेव्हा त्या अपघातात इतर २ जणांना ओरखडे का पडले नाहीत?

◆तपास सीबीआयकडे सोपवण्याचा कोणाचा निर्णय होता मुंडे यांच्या कारचा चालक व त्याचा सेक्रेटरी यांच्यावर कारवाई का झाली नाही? मुंडे यांच्याकडे राहिलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर काय कारवाई करण्यात आली? त्याची चौकशी का झाली नाही?

◆ या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी कोणती मुलगी शंका व्यक्त करताना फेसबुक पोस्ट हटवण्याची गरज का भासली?

वरील सर्व शंकांमुळे आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. आजही कार्यकर्त्यांना जेव्हा या घटनेची आणि या प्रकरणाची आठवण होते तेव्हा त्यांचा यावर विश्वासच बसत नाही हे तितकेच खरे…

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा