राहुल गांधीना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधीना केली आहे.

त्यांच्या या वक्तव्याविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.
राहुल गांधी यांनी संथालपरगणा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. त्यावेळी मोदींवर टीकास्त्र सोडताना मोदींचे ‘मेक इन इंडिया’ आता भारतात ‘रेप इन इंडिया’ बनले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा