फलटण, सातारा १५ डिसेंबर २०२३ : अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा गोखळी गाव ते गीते वस्ती बंधारा प्रलंबित होता परंतु दिवाळी अधिवेशन पुरवणी मागण्या द्वारे फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी गोखळी ते गीते वस्ती बंधारा एक कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती गोखळी गावच्या सरपंच सुमनताई गावडे यांनी दिली. हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्या द्वारे फलटण कोरेगाव मतदार संघातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी गोखळी ते गीते वस्ती बंधाऱ्यापर्यंतच्या रस्त्यासाठी तब्बल एक कोटी रुपये तरतूद झाल्याने गोखळी ग्रामस्थांच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे अनेक दिवसांपासून गावच्या सरपंच सुमनताई गावडे, गोखळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी या कामाची मागणी केली होती.
हिवाळीअधिवेशन पुरवणी मागण्यांमध्ये आमदार दीपक चव्हाण यांनी ही मागणी व या रस्त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने अनेक दिवसांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सरपंच सुमनताई गावडे, सर्व ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे गोखळी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार