अमरावती २६ फेब्रुवारी २०२४ : राज्य शासनाने काढलेल्या विधेयक क्रमांक ६४ मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून आज अमरावती जिल्हाभरातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करून या विधेयकाचा निषेध करण्यात आला.
या सुधारित कायद्यानुसार बाजार तळाच्या बाहेर प्रक्रियाकार निर्यातक आणि संघटित किरकोळ व्यापारी म्हणजेच कुणाकडून ही कृषीमाल खरेदी करता येईल तसेच सुचविण्यात आलेल्या सुधारणा या शेतकरी, बाजार समिती व्यापारी अडते, अन्य बाजार घटक तसेच सामान्य जनतेच्या हिताचे नाहीत. यामुळे बाजार समितीचे उत्पन्न बंद होऊन बाजार समिती अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शुकशुकाट बघायला मिळाला.
आज अमरावती बाजार समिती सह जिल्ह्यातील १४ ही बाजार समितीने बंद करून निषेध नोंदवला. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे म्हणून या सुधारणा विधेयकाला विरोध आहे अशी प्रतिक्रिया अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सागर डोंगरे