होळी सणासाठी सृष्टी सजली, जालन्यात बहरली पळस फुलांची झाडे

जालना १८ मार्च २०२४ : होळी सणाची चाहूल लागताच सृष्टी सजली असून जालन्यात पळसाची झाडे गर्द केशरी रंगांनी बहरलीय. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या पळसाच्या बहरलेल्या झाडांनी निसर्गात वेगळाच रंग भरलाय. एकीकडे होळीचा सण अवघ्या ७ दिवसांवर आलाय दुसरीकडे पळसाची झाडे बहरली असून गर्द केशरी रंगाची फुले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेताय.

उन्हाळा सुरू झाला शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन झालय, या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पळसाची फुलं सुद्धा बहरली आहेत. या पळसाच्या फुलांचा होळीच्या सणात नैसर्गिक रंग बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो, ग्रामीण भागात आज ही होळीसाठी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी पळस फुलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शिवाय आयुर्वेदातही या पळसाचं मोठं महत्त्व आहे, पळस फुलांचे अनेक औषधी गुणधर्म असून नागरिक या फुलांचा अनेक आजारांवर औषधी म्हणून उपयोग करतात. जालना नांदेड महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पळसाच्या फुलाचे हे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यात भुरळ पडत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा