मंठ्यातील दिंडी महामार्गांवरील नायगाव टोलनाक्यापुढील खड्डा झाला जीवघेणा

मंठा, जालना ८ जुलै २०२४ : जालन्याच्या मंठ्यातील दिंडी महामार्गांवरील नायगाव टोलनाक्यापासून केहाळ वडगाव, माळेगावं, जयपूरकडे जाण्याऱ्या रस्त्यावरील खड्डा जीव घेणा ठरतोय. रात्री बेरात्री वाहन धारकांना या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे सतत अपघात घडत आहेत. हा मार्ग नागरिकांच्या जीवावर उठला की काय?असे चित्र आता निर्माण झालय. एवढे अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी मुकदर्शक झाले आहे.

या मार्गांवरून तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वझर सरकटे, भुवन, पोखरी केंधळी, बेलोरा, शिवनगिरी, एरंडेश्वर, जयपूर, माळेगाव, केहाळ वडगाव या गावांतील तालुक्याला जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असल्यामुळे वाहनांची वर्दळ असते. व्यावसायीक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी येथून ये-जा करतात. त्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. याच ठिकाणी तीन व्यक्ती खड्यात पडून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. असे असूनही सार्वजनिष्ठ बांधकाम विभाग रस्त्याची दुरुस्ती करण्यास पुढाकार घेताना दिसून येत नाही.

या मार्गावर अपघाताची मालिका सुरु असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा तसेच खड्ढा बुजवून योग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : राजकुमार कांगणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा