भाजप नेते जगदीश मुळीक यांचे फेसबुकवर फेक अकाउंट

पुणे २८ जुलै २०२४ : भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष व आमदार जगदीश मुळीक हे सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरीकांशी संपर्क साधत असतात. त्यांना मिळणारा प्रतिसाद बघून कोण्या अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर त्यांच्या नावाचे फेक अकाउंट तयार केले आहे. या फेक अकाउंटला कोणीही फॉलो करू नये. या फेक अकाउंट वरून काही मेसेज आल्यास त्यात उत्तर किंवा प्रतिसाद देऊ नये असे आवाहन जगदीश मुळीक यांनी केले आहे.

हे फेक अकाउंट सुरू असल्याचे तीनचार दिवसांपूर्वीच त्यांच्या लक्षात आले. मूळ फेसबुक पेज प्रमाणेच त्यांचा फोटो वापरून फेक पेज फेसबुकवर तयार कऱण्यात आले असल्याची बाब लक्षात आली. त्यांच्या फेसबुक वर कनेक्ट असणा-यांनी त्यांची पेजवर लेटेस्ट महिती बघावी. फेसबुक पेज साधारणत: रोज अपडेट केले जाते. त्यामुळे तेथे रोज काय मी उपक्रम करत आहे याची फोटोसह महिती त्याच दिवशी टाकली जाते.

माझ्या फेसबुक अकाउंट फॉलोअर्सची संख्या ३४ हजार व फेसबुक पेज फॉलोअर्सची संख्या ३३३K(हजार)आहे. त्यामुळे चुकून आपण फॉलो केल्यावर फॉलोअर्सची संख्या कमी म्हणजे दीडदोन हजार किंवा त्यापेक्षा थोडी जास्त दिसली तरी ते फेक अकाउंटचे पेज उघडले गेले आहे असे समजावे. तसेच माझ्या पेजवर रोजची महिती अपडेट केलेली असते. लेटेस्ट अपडेट केल्याची तारीख तपासावी असे आवाहन जगदीश मुळीक यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा