नागरिकत्व कायदा आणून केंद्र सरकार आर्थिक मंदीकडे दुर्लक्ष करतय: राज ठाकरे

पुणे : देशात आर्थिक मंदी असताना लोकांचे लक्ष वळवण्यासाठी अमित शहा यांनी देशात नागरिकत्व कायदा आणला. तसेच आज नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलने सुरू आहेत. त्याबद्दल मी अमित शहा यांचे अभिनंदन करतो, अशी उपहासात्मक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, असले कायदे आणून गोंधळ करायची गरज नव्हती. आधार कार्ड या देशाचा नागरिक आहे हे सिद्ध करू शकत नसेल तर त्याचा उपयोग काय?इतर देशातील लोकांना सामावून घ्यायला भारत काही धर्मशाळा नाही. १३५ कोटी लोकसंख्येच्या देशाला आणखी काही नागरिकांची गरज आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर केला आहे.
इथले आहेत त्यांची सोय लागत नाही. त्यामुळे बाहेरच्‍या लोकांना पोसण्‍याची गरज नाही.
स्‍थानिक तरुण- तरुणी बेराजगार आहेत, मग बाहेरच्‍यांना का आणायचे, असेही त्यांनी म्हटले आहे. हा हिंदू- मुस्लीम वाद नाही, जे बाहेरचे आहे त्यांना बाहेर काढावे लागेल. जो महाराष्ट्रातील मुसलमान आहे तो दंगली करत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा