नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळे

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. मात्र छोटीशी सहल काढून, प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत जर नवीन वर्ष साजरे केले तर त्याचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. आज जाणून घेऊयात नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने भेट देता येतील अशी काही पर्यटनस्थळे.

मुन्नार व कोचीन : केरळला देवांची भूमी असे म्हटले जाते. केरळमध्ये विविधतेने नटलेली निसर्गसंपदा, आकर्षित करणारे समुद्रकिनारे, चहाचे मळे आणि तेथील खाद्यसंस्कृती इत्यादी गोष्टी मनाला भुरळ पडणाऱ्या आहेत. येथील फोर्ट कोचीन, मुन्नार, कन्याकुमारी, वर्कला, थेककडी इ. ठिकाणे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

कोकण : कोकणातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुपाऱ्यांच्या बागा, जलदुर्ग, खाण्यापिण्याची चंगळ यामुळे कोकण इतर पर्यटनस्थळांच्या तुलनेत वेगळे ठरते. कोकणातील गणपतीपुळे, महाबळेश्वर, मालवण, तारकर्ली, दिवेआगर, दापोली, देवबाग तसेच पाचगणी वगैरे ठिकाणं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी योग्य ठरतात.

राजस्थान : राजस्थानमधील अरवली पर्वतरांगांमधील माऊंट अबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. माऊंट अबू येथील नद्या, धबधबे आणि प्रसिद्ध लेण्यांचं वातावरण नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करू शकतं. येथील नखी तलाव, दिलवाडा मंदिर, अचलगढ किल्ला इत्यादी ठिकाणे पर्यटकांना फिरण्यासाठी पर्वणी आहेत. राजस्थानमधील गुलाबी शहर जयपूरकडे देखील जगभरातील पर्यटक आकर्षित होत आहेत.

गोवा : तरुणांमध्ये गोवा हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोवा येथे सुप्रसिद्ध बीच, पर्वत आणि समुद्र आहे. जर आपण निळा समुद्र, वाळूचे समुद्र यांचा आनंद घेऊ इच्छित असाल तर गोवा येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला जाऊ शकता. गोव्यातील बेनोलीम, कंडोलिम, पणजी, मापुसा इत्यादी ठिकाणे फिरण्यासारखी आहेत.

कर्नाटक : कर्नाटकातील भौगोलिक वैविध्य आणि निसर्गसंपदा यामुळे कर्नाटक राज्य हे पर्यटकांना आकर्षित करते. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे येथे पर्यटकांची गर्दी असते. कर्नाटकमधील अनेक समुद्रकिनारे नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुयोग्य ठरतात. येथील हंपी हे ठिकाणीदेखील फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे.

हिमाचल प्रदेश : डलहौसी, कुलू, मनाली, धरमशाला, सिमला, मसूरी, नैनिताल, रानीखेत, दार्जिलिंग, धौलाधार, चक्राता इ. प्रमुख गिरिस्थाने आहेत. काश्मीरचे खोरे, गुलमर्ग, पहलगाम, खज्जियार (फुलांचे खोरे) ही पर्यटकांची विशेष आकर्षण स्थळे आहेत. येथे नवीन वर्ष साजरे करणे आनंददायी ठरू शकते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा