नीरा येथे बालसैनिक मेळावा संपन्न

पुरंदर (प्रतिनिधी): नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळेत बाल सैनिक मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात ड्रिल वाहतुकीचे इशारे , आर एस पी अक्षर, आदर्श चौका-चौकात बॉम्बस्फोट झाल्यानंतर काय काळजी घ्यावयाची याचे प्रशिक्षण देण्यात आले .

नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळेच्या प्रांगणात झालेल्या तीन दिवसीय बाल सैनिक मेळाव्याला महर्षी वाल्मिकी विद्यालय, वाल्हे, महात्मा गांधी विद्यालय नीरा, व सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळा नीरा या विद्यालयातील ३९० विद्यार्थी सहभागी झाले होते. मेळाव्याच्या समारोप प्रसंगी जिल्हा समादेशक रमेश महाडिक, ग्रा. पं. सदस्य अनिल चव्हाण, किरण जेधे, प्राचार्या सुवर्णा बोडरे आदी उपस्थित होते.

यावेळी अनिल चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी गावातील चौकात थांबुन वाहतुकीचे प्रात्यक्षिके करावेत असे आवाहन केले. त्याकरिता ग्रामपंचायत सर्व सहकार्य करेल. तीन दिवसीय बाल सैनिक मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर हनुमंत जाधव किशोरी सातव, भारत पाटील – वालचंद नगर, विक्रांत पंडित – उरळीकांचन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ड्रिल वाहतुकीचे इशारे, आर. एस. पी. अक्षर, आदर्श चौका – चौकात बॉम्बस्फोट झाल्यानंतर काय काय करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले . या विद्यार्थ्यांना आर.एस.पी. चे नियम पटवून दिले.

बाल सैनिक मेळावा यशस्वी करण्यासाठी वाल्हे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनिल मखरे , महात्मा गांधी विद्यालयाचे सागर आवळे, शिवाजी कुंभार , बयाजी धायगुडे तसेच कन्या विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मदत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल शिंदे यांनी केले तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक उत्तम काळे यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक अशोक कोलते यांनी परिश्रम घेतले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा