नगर शहर महिनाभरात होणार कचराकुंडी मुक्त

अहमदनगर : शहर आगामी महिनाभरात कचराकुंडी मुक्त करणार, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
शहरातील १०६ पैकी ४५ ठिकाणच्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कचराकुंडी मुक्त शहर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाकळे यांनी केले आहे.
खतप्रकल्प, हॉटेल वेस्ट, मृत जनावरांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमेथानेशन प्रकल्प, मोठ्या मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनी, ४ छोटे खतप्रकल्प, सेफ्टी टँकमधील उचलण्यात आलेल्या मैल्यावर प्रक्रियेसाठी एफएसटीपी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी काहींचे काम सुरू झाली आहेत.
स्वच्छता सर्वेक्षणात सुधारणा होण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरु केल्या आहे. यासाठी सरकारी सुट्टी वगळता अधिकारी व कर्मचार्‍यांना महिनाभर रजा मिळणार नसल्याचे वाकळे यांनी स्पष्ट केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा