नागरिकत्ववरुन अनुराग कश्यपचे ट्विट “वॉर”

मुंबई : चित्रपट निर्माता दिगदर्शक अनुराग कश्यप सध्या आपल्या ट्वीटरवॉरमुळे जोरदार चर्चेत आहे. CAA विरोधात ट्विटरवरून सध्या भाजपवर टीका केली जात आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (CAA) ला सपोर्ट करण्यासाठी एक टोल फ्री नंबर दिला आहे. यालाच टार्गेट करत अनुराग कश्यपने ट्विट केलं आहे. त्यामुळे अनुराग कश्यप भाजपवर चांगलाच भडकला असल्याचे पहायला मिळत आहे.

ट्विटमध्ये अनुरागने म्हटले आहे की, ‘क्या बात है अमित शाह साहेब. एकच नंबर दोघांकडे. अमित मालविया आणि भाजपचा हा साइड बिझनेस आहे का? की लोकांना बनवलं जातं आहे, जे तुम्ही आतापर्यंत करत आलात तसं’.
भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवरून ८८६६२८८६६२ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमचा पाठिंबा द्या असं आवाहन केलं होतं.
मात्र हा क्रमांक शेअर करत एकाने मोफत सेक्ससेवा मिळणार असल्यांची पोस्ट ट्विट केली आहे.
या दोन्हीचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने भाजपवर टीका केली आहे. हा एकच क्रमांक दोघांकडे आहे. म्हणजे हा तुमचा जोडधंदा आहे का? असं म्हणतं तुम्ही नेहमीप्रमाणे लोकांना मुर्ख बनवत आहात का? असा सवाल विचारला जात आहे.

CAA कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. देशभरातून अनेक ठिकाणी या विरोधात आणि या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघत आहे. याच पार्श्वभूमीवर या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर फोन करून मिस कॉल देण्याची मोहिम भाजपने सुरू केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा