उपराष्ट्रपतींच्या विरोधात फेसबुक वर केलेली पोस्ट तरुणीला पडली महागात

The Comptroller and Auditor General of India, Shri Rajiv Mehrishi calling on the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, in New Delhi on September 28, 2017.

बारामती,२८ जुलै २०२० : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन त्यांच्या बद्दल अक्षेपार्ह विधान करत फेसबुकवर पोस्ट केल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा वैभव सोलनकर यांनी दाखल केला आहे.

‌दोन दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन खालच्या भाषेचा वापर करत फेसबुक वर पोस्ट करणाऱ्यांवर बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यामध्ये पुजा झोळ यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली असल्याचे वैभव सोलनकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन भादवि कलम ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लोकशाहीचा अतिरेक झाला आहे. पोस्ट करणारी ही महिला असून माजी महिला मुख्यमंत्र्यावरती असे स्पष्टीकरण देणे चुकीचे आहे.
असे मत वैभव सोलनकर (ABVP प्रदेश कार्यकारिणी सदस्य) यांनी व्यक्त केले

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा