आमिर खानला पुन्हा बसणार धक्का, लाल सिंग चड्ढा ऑनलाईन लीक

पुणे, १२ ऑगस्ट २०२२: आमिर खानचा बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढा हा चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाबाबत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मात्र, आमिरचा चित्रपट बहुतांश लोकांना पसंत पडत आहे. सेलिब्रिटींपासून अनेक चाहत्यांपर्यंत या चित्रपटाचं वर्णन ब्लॉकबस्टर म्हणून केलं जात आहे. आमिरच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. पण या बातमीने आमिरला धक्का बसू शकतो.

लाल सिंग चड्ढा ऑनलाइन लीक

बॉयकॉट ट्रेंडमुळं आमिर खानच्या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली आहे. आमिरचा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. मात्र आमिर खानचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढा काल रिलीज झालाय आणि आता हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याच्या बातम्या येत आहेत.

हो तुम्ही बरोबर ऐकलं. रिपोर्ट्सनुसार, लाल सिंह चड्ढा Tamilrockers, movierulz आणि पायरसीवर आधारित अनेक वेबसाइटवर लीक झाला आहे. टेलिग्रामवरही चित्रपट लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. असं सांगितलं जात आहे की काही टेलिग्राम ग्रुप्सना चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्याचा पर्याय दिला जात आहे.

चित्रपटाच्या व्यवसायावर होणार परिणाम!

रिलीजच्या दिवशीच चित्रपट लीक झाल्यामुळं लाल सिंग चड्ढाच्या व्यवसायाला फटका बसू शकतो. आमिर खानने त्याच्या चाहत्यांना विनंती केली होती की त्यांनी चित्रपटगृहात जाऊन त्याचा चित्रपट पाहावा. अशा परिस्थितीत चित्रपट लीक झाल्यामुळं लोकांनी तो ऑनलाइन पाहिला तर त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होईल. पण चित्रपट ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चित्रपट लीक झाले आहेत.

लाल सिंग चड्ढा हा ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आमिर खानच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या रक्षाबंधन चित्रपटाशी टक्कर होत आहे. आता बघूया कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचे जास्त प्रेम मिळतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा