अतंकवाद्यांशी लढताना २ उच्च अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीर, दि. ३ मे २०२०: जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली. या कारवाईत दोन सैन्य अधिकाऱ्यांसह ५ सैनिक शहीद झाले आहेत. सैन्याने येथे दोन परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमधून मिळालेल्या माहितीनुसार कालपासून ही चकमक सुरु होती . येथे आत्ता गोळीबार थांबला आहे, परंतु लष्कराचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

स्फोटकांनी नष्ट केले दहशतवादी ठिकाण:

चकमकीपूर्वी दोन परदेशी दहशतवादी एका घरात लपल्याची लष्कराला माहिती मिळताच सैन्याने दहशतवाद्यांचे हे ठिकाण उडवले. स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली, त्यानंतर सैन्य आता त्या पडलेल्या घराच्या ढिगाऱ्यात त्यांचा शोध घेत आहे.

लष्कराची शोधमोहीम सुरूच आहे:

या व्यतिरिक्त लष्कराकडूनही या भागात शोध मोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढत आहेत. या व्यतिरिक्त पाकिस्तान नियंत्रण रेषेत सतत युद्धबंदी (सीज फायरिंग) तोडत आहे. यातूनच पाकिस्तान आतंकवादी देशात सोडत आहे.

यापूर्वी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यामुळे सुरक्षा दलाने पुलवामा येथील डांगरपोरा येथे पहाटे सहा वाजता शोधमोहीम राबविली होती. स्वत: ला वेढलेले पाहून सुरक्षा दलावर गोळीबार करत दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा