पुणे महापालिकेकडून ८१ फटाका स्टॉल धारकांवर कारवाई, उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे, दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक रस्त्यामध्ये फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी फुटपाथवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. त्याचबरोबर शहरांमध्ये अनाधिकृतपणे उभारलेल्या ८१ फटका स्टॉलमंडपावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपयुक्त माधव जगताप यांनी दिली. यापुढेही अशी कारवाई करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

पुणे महानगर पालिकेकडून मागील पाच दिवसात पंधरा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत क्षेत्रात अतिक्रमण निर्मुलन विभागाने कारवाई केली. यामध्ये नगररोड, येरवडा, बाणेर रोड, दत्तनगर, आंबेगाव गायमुख रोड, सासवड रोड, कड नगर रोड, कामधेनु इस्टेट भेकराई, वानवडी, वारजे-कर्वेनगर, वारजे गणपती माथा, विश्रांतवाडी, एअरपोर्ट रोड, सादलबाबा, धानोरी, भवानी पेठ या परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाी करण्यात आली. कारवाई वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी शहरामध्ये रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अनाधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायीकांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर महानगरपालिकेने फेरीवाल्यांना दिलेले परवाने व प्रमाणपत्रामधील अटी/शर्तींचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये परवानाधारकाने स्वत: व्यवसाय न करणे, पोटभाडेकरु ठेवणे, दिलेल्या जागेवर व्यवसाय न करणे, मान्यता दिलेला व्यवसाय न करणे, गॅस सिलेंडर शेगडीचा वापर करणे अशा अनाधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा