जिल्हा परिषद निधीतून २ हापसे मंजूर – मा.सभापती प्रवीण माने

इंदापूर, २३ जानेवारी २०२१: आपला इंदापूर तालुका पर्जन्यमानाच्या दृष्टीकोनातून तसा कोरडाच म्हणावा लागेल, दरवर्षी उन्हाळ्यात असाह्य झळा आपल्या भागाला सोसाव्या लागतात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागातून होणाऱ्या पावसाच्या सरासरीवर आपल्याकडील पाण्याची व्यवस्था अवलंबून असते.
यामुळे आपल्या कडे हापसा, किंवा बोअर मारत पाण्याची टंचाई भागविणे हे नित्यनेमाचे आहे. याच पद्धतीने येऊ घातलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पडल्या निमित्ताने नवनियुक्त ग्रा. प. सदस्य सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा विद्यमान पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्याकडे नागरिकांच्या वतीने हापस्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीला अनुसरून माने यांनी आपल्या जिल्हा परिषद फंडातून २ हापसे तात्काळ दिले. या हापस्यासाठी मारण्यात आलेल्या बोअरला आज पाणी लागले असल्याने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जाचकवस्ती मागील पाण्याचा जाच सुटला असे म्हणावे लागेल. याविषयी समस्त ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, तात्काळ काम पूर्णत्वास नेल्याबद्दल माने यांचेही आभार मानले आहेत.
आज या ठिकाणी  बोअर मारण्याचे काम सुरू असताना ग्रामसेवक आवाळे मॅडम, महेश निंबाळकर, प्रकाश नेवसे, विलास नाना जाचक, विक्रम निंबाळकर, मालोजी जामदार, दत्तात्रय जामदार, सिध्दार्थ जाचक, रमेश जामदार, हनुमंत जामदार, विशाल काळे, सागर पारलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा