आशिया चषक २०२३ चे वेळापत्रक आज जाहीर होणार, स्पर्धा ‘हायब्रिड फॉरमॅट’ मध्ये

दिल्ली, १९ जुलै २०२३ : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, आशिया कप २०२३ चे वेळापत्रक अखेर रिलीजसाठी तयार आहे. पीसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ बुधवारी, १९ जुलै रोजी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करतील. विशेष म्हणजे आशिया कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी लाहोरमध्ये आज संध्याकाळी ७:४५ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात हायब्रीड मॉडेलबाबत झालेल्या करारानंतर आशिया कप २०२३ चे आयोजन केले जाणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) जूनमध्ये अहवाल दिला होता की, आशिया कप २०२३ चे ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. यासोबतच भारत-पाकिस्तान सामनाही श्रीलंकेच्या मैदानावर होणार आहे.

आशिया चषक २०२३ स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील खराब संबंधांमुळे भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. आणि यावेळी ही स्पर्धा पाकिस्तानने आयोजित केली असल्याने नझम सेठी यांनी यातून मार्ग काढला. आशिया चषकाचे हायब्रीड मॉडेल नजम सेठी यांनी मांडले होते.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका व्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघही मैदानात उतरतील. आशिया कप २०२३ मध्ये दोन गट असतील. प्रत्येक गटातील २- २ संघ सुपर-४ मध्ये पात्र ठरतील. आणि, सुपर-४ टप्प्यातील टॉप २ संघ आशिया कप २०२३ फायनलमध्ये भिडतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा