औंध प्रभाग: कसं व कुठं कराल गणेश विसर्जन…?

पुणे, २७ ऑगस्ट २०२०: सध्या पुणे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं आहे. यंदाचा गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीनं पुण्यामध्ये साजरा करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने पूर्ण खबरदारी घेत गणेश विसर्जनासाठी देखील नियमावली बनवली आहे. यातच आता गणेश विसर्जन शक्यतो घरांमध्येच करावं किंवा शासनाकडून फिरता हौद देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु, त्याविषयी योग्य अशी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. हीच माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सयंत्रण समितीचे सदस्य आनंद विनायक जुनवणे यांनी न्यूज अनकटच्या माध्यमातून नागरिकांना याविषयी ही माहिती पुरवली आहे.

औंध गाव, सिद्धार्थ नगर, स्पायसर कॉलेज, जगदीश नगर, जुनवणे नगर, सिंध हौसिंग सोसायटी, अभिमान श्री सोसायटी, सानेवाडी, आय टीआय रोड, गुलमोहर पार्क, पुष्पक पार्क, आनंद पार्क, श्रीराम नगर, परीहार चौक, संघवी नगर, डीपी रोड, न्यू डी पी रोड, विधाते वस्ती, ह्या भागातील नागरिकांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. गणेश विसर्जनासाठी लागणारी अमोनियम बायकार्बोनेट पावडर
पुणे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अमोनियम बायकार्बोनेट

गणेश विसर्जनासाठी आवशक्य असणारी अमोनियम बाय कार्बोनेट पावडर प्रभाग क्रमांक ८ मधील औंध गाव आरोग्य कुटी, आयटीआय रोड आरोग्य कुटी, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री राजेंद्र वैराट ९६८९९३४०७६, मुकादम श्री चंद्रकांत लोखंडे औंधगाव आरोग्य कुटी ९०२८१९०८८२, अनिल पवार आयटीआय रोड आरोग्य कुटी ९३२६८७३४२६ यांच्याशी आपण संपर्क करावा

निर्माल्य, मूर्ती दान सुविधा

गोळवळकर गुरुजी प्राथमिक शाळा, इंदिरा गांधी प्राथमिक शाळा औंधगाव, पुणे महानगरपालिकेचे जुने क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी आपण संपर्क करावा

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा