भिगवण कोविड केअर सेंटरला जि.प. सदस्य हनुमंत बंडगर यांची भेट

इंदापूर, दि.१३ सप्टेंबर २०२०:भिगवण येथील कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी रुग्णांची विचारपुस केली. त्याचप्रमाणे सेंटरमधील सोयी सुविधांची पाहणी केली.

सध्या तालुक्याबरोबरच भिगवण परिसरात देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. भिगवण कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे याठिकाणी चालू असलेल्या केंद्रामध्ये कोरोनाचे उपचार चांगल्या प्रकारे मिळतात का, त्याचबरोबर रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भिगवण शेटफळ गढे जि.प. गटाचे जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी पीपीई किट परीधान करुन थेट कोरोना केंद्रात प्रवेश करुन रुग्णांची विचारपूस केली. त्याचप्रमाणे तेथील सोयी सुविधांची माहिती घेतली. याच सोबत जिल्हा परीषद सदस्य कॅश कार्ड योजनेतून प्राप्त झालेली ट्रिपल लेयर मास्क,एन ९५ मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, पल्स ऑक्सीमीटर ,थर्मामिटर, सोडिअम क्लोराइड आदी साहित्याचे वाटप बंडगर यांनी केले.दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर्स यांना देखील वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले.

यावेळी कोरोना सेंटर मधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांची रुग्णसेवा बघता जि. प. सदस्य हनुमंत बंडगर यांनी समाधान व्यक्त केले. भिगवण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे आणि समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी कोरोना सेंटर मधील रुग्णाची माहिती दिली.यावेळी जिल्हा परीषद सदस्य हनुमंत बंडगर, मार्केट कमीटीचे संचालक आबासाहेब देवकाते , राजेंद्र देवकाते यांच्याशी संवाद साधला.

अचानकपणे दिलेल्या भेटीने रुग्ण भारावून गेले. आपली आस्थेवाईकपणे चौकशी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले . काळजी करु नका कोरोनातून लवकर बरे व्हाल असं सांगून बंडगर यांनी रुग्णांचा आत्मविश्वास वाढविला. यावेळी बंडगर यांच्यासमवेत मदनवाडीचे माजी सरपंच अजिनाथ सकुंडे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र देवकाते,निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी – निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा