या तारखेपासून सुरू होणार बिग बॉस सिजन १४, जाणून घ्या संपूर्ण बातमी

मुंबई, १४ सप्टेंबर २०२०: टेलिव्हिजनवर प्रसिद्ध असलेला रियालिटी शो बिग बॉस सिजन १४ चा नवीन प्रोमो लाँच करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शो चा होस्ट अभिनेता सलमान खान आणि शो च्या निर्मात्यांनी शो केव्हा प्रसारित होणार आहे याची घोषणा केली आहे.

बिग बॉस २०२० हे ३ ऑक्टोबर २०२० पासून ऑन एअर जाणार आहे. जेव्हा या शो चा पहिला एपिसोड ऑन एअर केला जाईल तेव्हा या शो मधील स्पर्धक शो मध्ये एंट्री करणार आहेत. या शो चा प्रोमो जबरदस्त तयार करण्यात आला आहे. यात सलमान खान आकर्षक लूक मध्ये दिसत आहे.

या शो च्या प्रोमो मध्ये सलमान खान म्हणतोय, “बोरडम होणार चकनाचूर, टेन्शन चा उडणार फ्यूज, स्ट्रेस चा वाजणार बँड, होपलेस नेस ची वाजणार पुंगी.” असा असणार आहे बिग बॉस सिजन १४ चा प्रोमो. या मध्ये सलमान खान मास्क घालताना दिसून आला आहे. आणि त्याचे हाथ आणि पाय साखळी ने बांधलेले दाखवण्यात आले आहे. या साखळ्या तोडत असताना तो बिग बॉस १४ हा शो ३ ऑक्टोबर पासून येणार असल्याची घोषणा करत आहे.

या प्रोमोला कलर्स टिव्हीने सोशल मीडिया वर शेअर केले आहे. आणि कॅप्शन मध्ये लीहले आहे,” २०२० मधील प्रत्येक समस्येला चकणाचुर करण्यासाठी आला आहे. बिग बॉस ! बिग बॉस १४ ग्रँड प्रेमियर हा शनिवार ३ ऑक्टोबर रात्री ९ वाजता फक्त आपल्या कलर्स टिव्ही वर.” त्यानंतर हॅशटॅग मध्ये सिन पल्टेगा असे लिहले आहे.

तसेच या स्पर्धेत कोण कोण सहभागी होणार आहे याची माहिती अजूनही शो ने गुप्त ठेवली आहे. आणि येत्या काही दिवसात ते जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा