ढगाळी वातावरणामुळे पुढील आदेशापर्यंत जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सीसीआय कापूस खरेदी बंद

जालना ५ जानेवारी २०२४ : जालना कृषि उत्पन्न बाजार समिती मधील भारतीय कापूस निगमची (सीसीआय) कापूस खरेदी ढगाळी वातावरणामुळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्याचे सीसीआयने बाजार समितीला कळवले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात, शेतात आणि गोडावून मध्ये राखून ठेवला आहे.

भारतीय कापूस निगम(सीसीआय) कडुन पुढील आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस कृषि उत्पन्न बाजार समिती, जालनाच्या बाजार आवारामध्ये विक्रीसाठी आणू नये व आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर आणि सचिव मोहन राठोड यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा