केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती केल्या निश्चित

नवी दिल्ली: मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या किंमती आता सरकारने निश्चित केल्या असून त्याहून अधिक भावाने विकणाऱ्या विक्रेत्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी ट्विट करत ही माहिती दिली. २०० मिली सॅनिटायझरची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसंच त्यांनी मास्कची किंमत देखील निश्चित करण्यात आली असल्याचे सांगितले.

राम विलास पासवान यांनी सांगितले की, ‘कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून बाजारात विविध प्रकारचे मास्क, तसंच त्याच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि सॅनिटायझरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सरकारने याला गांभिर्याने घेत त्यांच्या किमती निश्चित केल्या आहेत.’

जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत २ आणि ३ प्लाय मास्कमध्ये वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकची किंमत १२ फेब्रुवारी २०२० रोजी जेवढी होती तेवढीच असणार आहे, असे पासवान यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. २ प्लाय मास्कची किरकोळ किंमत ८ रुपये आणि ३ प्लायची प्लायची किंमत १० रुपयांपेक्षा अधिक नसेल. करोना विषाणूच्या जलद प्रसारानंतर विविध फेस मास्क, त्यांच्या निर्मितीसाठी गरजेची सामुग्री आणि हँड सॅनिटायझरच्या किंमतीत वाढ झालेली आहे. सरकारने याकडे गांभिर्याने पाहत किंमती निश्चित केल्या आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा