शीर्षक वाचून तुम्हाला वाटत असेल आता हे काय नवीन? हे नवीन आहेच आणि शिवाय हि पाककृती चविष्ट देखील आहे. चला तर मग शिकुयात नवीन पाककृती, पपईच्या पुऱ्या :
साहित्य-
एक वाटी पिकलेल्या पपईचा गर, दीड वाटी कणीक, हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा तिखट, पाव चमचा धणे-जिरे पूड, एक चमचा तीळ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती-
प्रथम एका बाऊलमध्ये पपईचा गर घेऊन त्यामध्ये कणीक, हिंग, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, तीळ, एक चमचा तेल व चवीनुसार मीठ घालून घट्ट गोळा मळून घ्या. नंतर त्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करुन पुऱ्या तयार करुन हलक्या लाल रंगावर तळून घ्याव्या. या गरमागरम पुऱ्या आवडीच्या भाजीसोबत सर्व्ह कराव्यात.