इयत्ता चौथीच्या आभ्यासक्रमातुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळण्यात आला आहे.राज्याच्या अंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा हा पराक्रम पाहायला मिळतोय. इतिहास वगळण्याचा घाट त्यांनी घातला आहे. स्थानिक संस्कृती जपत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून असे करण्यात आले असेल तर हा निव्वळ मूर्खपणा म्हणावा लागेल, कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीत शिवाजी महाराजांचा इतिहास हा अविभाज्य घटक आहे. ज्या महाराजांनी हे स्वराज्य उभ केल त्यांनाच इतिहासातून वगळण्याच्या प्रकाराला मूर्खपणा च म्हणावं लागेल. या आधी ही शैक्षणिक अभ्यास क्रमात गणित या विषयात बदल करण्यात आले होते.गणिताच्या या आकडेवारी पर्यंत ठीक होते पण आता संस्कृतीवर घाला घातलाचे चित्र दिसत आहे. या मुळे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासापासून मुले अज्ञात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधीमंडळात झाला होता. त्यानंतर अनेक सरकारे बदलली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कायम ठेवण्यात आला होता. या प्रकारावर बोलण्यास अंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
निवडणुका जवळ आल्यामुळे विरोधी पक्षातील नेते या प्रकारावर आपआपली मते मांडत आहेत पण हा झाला राजकारणाचा मुद्दा प्रत्यक्षात या कारभारावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून या प्रकारावर कही प्रयत्न केला जात आहे का हे पुढे कळेलच.
एका बाजूला जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अभ्यास केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराज्यांच्या जन्मभूमीतच त्याचा इतिहास पुसला जात आहे ही लाजीरवाणी गोष्ट आहे.