मुख्यमंत्र्यांना फुलंब्रीच्या चहाचा मोह, टपरीवर चहा घेतला

फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर ३ ऑगस्ट २०२४ : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी शुक्रवारी सिल्लोड येथे मुख्यमंत्री उपस्थित होते. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ आणि लाभार्थी महिलांना लाभ वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथून छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना फुलंब्री येथील आकाश ढोके यांच्या सावता टी हाऊस वर थांबून चहा घेतला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुर्ण ताफा फुलंब्री नगरपंचायत समोर थांबवून उभ्यानेच चहाचा आस्वाद घेतला. चहा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा हॉटेल मालक आकाश ढोके यांना चहाचे बिल दिले.

या पुर्वी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते, तेव्हा सुद्धा सिल्लोड दौऱ्यावर असताना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सह फुलंब्री येथे थांबून जब्बार पटेल यांच्या हॉटेल वर चहा घेतला होता. या चहापानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबत आमदार प्रदीप जैस्वाल, फुलंब्री नगरपंचायतचे माजी गटनेते तथा नगरसेवक अब्दुल रऊफ कुरैशी, नगरसेवक इलियास पटेल, किशोर बंलाडे, अजय गंगावणे, भागीनाथ नागरे, मोबीन शाह यांच्या सह अनेक शहरवासी उपस्थित होते. यावेळी फुलंब्री पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : मिलिंद कुमार लांडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा