औरंगाबाद जिल्ह्यात बनावट दारू तयार करणारा कारखाना उध्वस्त

औरंगाबाद, दि.७ मे २०२० : औरंगाबाद जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील गोडाऊनमध्ये बनावट देशी-विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्यामध्ये तीन आरोपींसह ६३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संजय भागवत (वय ४८), महेश भागवत (वय २६), योगेश डोंगरे (वय २६) रा. गल्लेबोरगाव ता. खुलताबाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गल्लेबोरगाव शिवारात बनावट दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि.६) दुपारी तीनच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला.

पोलिस आल्याचे पाहून काही जणांनी शेतात धूम ठोकली तरीही तीन आरोपींना अटक केली आहे.  या ठिकाणी मारलेल्या छाप्यात बनावट देशी-विदेशी दारूसह स्पिरिटचे १८ ड्रम आढळून आले. तसेच देशी दारूचे ७९ बॉक्स, टाकीमध्ये ठेवलेली १ हजार लिटर देशी दारू, पॅकेजिंग मशीन, दोन मिक्सर, एक आयसर ट्रक, तवेरा गाडी, महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ६३ लाख ८३ हजार ८१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा