जलशक्ती मंत्रालयावर ‘सायबर हल्ला’; हॅकर्सनी Twitter केले हॅक

नवी दिल्ली, १ डिसेंबर २०२२ : मागील आठवडाभरापासून दिल्ली एम्सचे सर्व्हर ठप्प आहे. ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, आता आणखी एक मोठा सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी हॅकर्सनी मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटला लक्ष्य केले. यानंतर हॅकर्सनी ग्राफिक्स पोस्ट केले, त्यावर Join Testnets आणि sui wallet असे नमूद केले होते. या ट्विटद्वारे त्यांनी अनेकांना टॅग देखील केले. याबाबत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. घाईघाईत सोशल मीडिया टीमने अकाऊंट रिस्टोअर केले आणि सर्व ट्विट डिलीट केले.

दरम्यान, मंत्रालयाची वेबसाइट आणि इतर गोष्टीही तपासण्यात आल्या. मात्र, हॅकर्सनी केवळ ट्विटर हँडलला टार्गेट केले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा