जालना जिल्ह्यातील वाटूर फाट्यावर अतिक्रमणामुळे कोरोनाचा धोका

जालना, दि.२७ मे २०२० : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे रोडवरील अतिक्रमणामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतूर मंठा तालुक्यातील वाटूर ही मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे जवळपासच्या चाळीस खेड्यांतून लोक इथे खरेदीसाठी येत असतात.

मात्र मुख्य बाजारपेठ असलेल्या जयपूर रोडवर दोन्ही बाजूंनी दुकानदारांनी अतिक्रमण करून प्रत्येक दुकानाच्या समोर पान टपरी किंवा फळाचा गाडा याठिकाणी थाटलेला दिसतो. प्रत्येक टपरीवाल्यांकडून पन्नास हजार रुपये डिपाॅझिट आणि चार हजार रुपये महिना हे दुकानदार वसूल करत आहेत.

या अतिक्रमणामुळे रोड पूर्ण व्यापला गेला असून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. रस्त्यावरच गर्दी होत असताना कोरोना विषाणूचा धोकाही अधिक बळावण्याची शक्यता आहे.

याबाबत वाटूर ग्रामपंचायतने दुकानदारांना नोटीस देवून अतिक्रमण हटवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. परंतू दुकानदार या सुचनांना जुमानत नसल्याचा प्रकार या ठिकाणी घडताना दिसत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा