दिल्ली विदयापीठ ही एक चळवळ, दिल्ली विदयापीठ शताब्दी समारोहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुगौद्वार

नवी दिल्ली, ३० जून २०२३: देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना दिल्ली विदयापीठाने १०० वर्षे पूर्ण केली आहेत. दिल्ली विदयापीठ हे केवळ विदयापीठ नाही, तर एक चळवळ आहे. या विदयापीठाने प्रत्येक चळवळ जगली आहे आणि प्रत्येक चळवळीला जिवंत केले आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विदयापीठाबाबत कौतुगौद्वार काढले आहेत.

दिल्ली विश्वविदयालयाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाले असून शताब्दी वर्षानिमित्त विश्वविदयालयात खास समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाची आज सांगता होत असुन यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी विदयापीठाकडून खास तयारी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी कॉम्प्युटर सेंटर आणि फॅकल्टी ऑफ टेक्नॉलॉजी आणि दिल्ली विदयापीठाच्या शैक्षणिक ब्लॉकची पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले एक काळ होता जेव्हा दिल्ली विदयापीठाच्या अंतर्गत फक्त ३ महाविदयालये होती, आता त्यात ९० पेक्षा जास्त महाविदयालये आहेत. एक काळ असा होता की भारत नाजूक अर्थव्यवस्थांच्या यादीत येत होता आणि आज ती पहिल्या ५ जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये आहे. आज डीयूमध्ये शिकणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. पंतप्रधानांनी याशिवाय इतर शैक्षणिक विषयांवरही यावेळी भाष्य केले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा