संयमी सेवाभावी संस्थेतर्फे श्रावणबाळ आश्रम येथे मोफत किराणा वाटप

माढा, दि.२४ ऑक्टोबर २०२० : संयमी सेवा भावी संस्था रांझणी (दें) ता.माढा यांच्यावतीने इंदापूर येथील श्रावणबाळ आश्रम येथील मुलांना एक महिना पुरेल असा किराणा बाजार देण्यात आला.हा कार्यक्रम संयमी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आला.तरुणपिढीनेआपल्या वाढदिवसानिमीत्त सामाजिक उपक्रम राबवुन ,गरीब व्यक्तींना मदत करा आसा संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.

जाधव हे संयमी संस्थे मार्फत असे अनेक उपक्रम राबवत असतात.त्यांनी कोरोनाच्या संकट काळात रक्तदान शिबिरे घेऊन स्वत: देखील सातत्याने रक्तदान  करत असतात, त्यांनी कोरोनाच्या संकटामध्ये ४ वेळा रक्तदान करून आज पर्यंत त्यांनी ७१ वेळा रक्तदान केले आहे.

तसेच त्यांनी रांजनी मध्ये लॉक डाऊन च्या काळात ज्यांची घरे मोल मजुरी केले शिवाय चालत नाहीत अशा गरजू ३१ कुटूंबाना संयमी संस्थे मार्फत एक महिना पुरेल असा मोफत किराणा बाजार दिला होता, कोरोनावर जनजागृती म्हणून त्यांनी “नका जाऊ घाबरुनी ,साथ द्या बंध पाळुनी ” असा व्हिडीओ अल्बम देखील  केला होता.

ते संस्थेच्या वतीने महिला मेळावे , महिला हेल्थ चेकअप , रक्तदान शिबिरे, गरजूंना मदत असे विविध सामाजिक काम ते करत असतात.दत्ता जाधव हे इंदापूर येथील डॉ. मिलिंद खाडे सर, आणि डॉ. कल्पना खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने लवकरच १०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण करणार असे ठामपणे सांगत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा