संजय राऊत यांना ईडी कडून झटका, जामीन देण्यास दर्शवला विरोध

पुणे, १६ सप्टेंबर २०२२ : मनी लॉन्ड्रींग आरोप प्रकरणात दोन महिन्याहून अधिक काळापासून न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा मोठा झटका दिला आहे. संजय राऊत यांना ईडीने जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष ‘पीएमएलए’ कोर्टात ईडीने आज उत्तर दाखिल केले आहे.

सध्या संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. ८ तारखेला संजय राऊत यांनी जामीनसाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबर पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरील आज मुंबई सत्र न्यायालयात आपले उत्तर सादर केले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीने स्पष्ट विरोध केला आहे. गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत.

१०३४ कोटीच्या कथित पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. अनेक वेळा त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. कथित पत्राचाळ घोटाला प्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीने अटक केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा