काबूलमधील रशियन दूतावासाजवळ स्फोट, २० जणांचा मृत्यू

काबूल, ५ सप्टेंबर २०२२ : अफगाणिस्तानची राष्ट्रीय राजधानी काबूल येथे रशियन दूतावासा जवळीक परिसरात आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन रशियन व्यक्तींचा समावेश असून २० लोक ठार झाले आहेत. तर जखमींची संख्या स्पष्ट झाली नाही. मृत्यु आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे. तालिबानच्या राजवटीत बॉम्बस्फोट करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने ही माहिती दिली आहे.

शुक्रवारी हेरात प्रांतातील मशिदीला हादरवून सोडणाऱ्या स्फोटात ठार झालेल्या लोकांमध्ये एक विशेष अफगाणी धर्मगुरूचा समावेश होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला, असे टोलो न्यूजने म्हटले आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, एका मशिदीत मोठा स्फोट झाला, परिणामी किमान २१ लोक ठार झाले आणि ३० हून अधिक जण जखमी झाले. गेल्या वर्षी ऑगस्टच्या मध्यात तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशात एका पाठोपाठ बॉम्बस्फोट होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कारकिर्दीत देशात मृतांची संख्या जास्त होती पण स्फोटांची संख्या कमी होती.

२०२१ साली, इमाम बारगाह-ए-फातिमा मशिदीमध्ये नमाज पठण करताना ६० हून अधिक लोकांना जीव गमवावे लागले होते. तत्पूर्वी, शिया मशिदीला एका भीषण स्फोटाने लक्ष्य केले होते ज्यात ८३ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. अफगाणिस्तानात सत्तेसाठी तालिबानशी स्पर्धा करणाऱ्या ISIS-K ने नंतर हल्ल्याची जबाबदारी स्वता घेतली आहे. हल्ल्यानंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) या घटनेचा निषेध केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा